मालमत्ता करातील 10 टक्के सवलतीला 15 जुलैपर्यत मुदतवाढ

ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी हा कमी असल्याने करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार करदात्यांचा करसवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून करसवलत योजनेस प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. जे करदाते 2022-23 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 16 जून ते 15 जुलै पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यापूर्वी ठाणे महापालिका हद्दीतील जे करदाते 2022-23 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 15 जूनपर्यंत जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला होता. परंतु हा कालावधी कमी असून करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी म्हस्के यांनी केली होती. त्यानुसार जे नागरिक 16 जून ते 15 जुलै या कालावधीत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच 16 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत 3 टक्के, 16 ते 31 ऑगस्टपर्यंत जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत जमा करु शकतील. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे,याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे या कालावधीत प्रत्येक शनिवारी सकाळी 10.30 ते सायं 5.00 पर्यत सुरू राहतील. करदाते आपला कर www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर किंवा propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे भरु शकतील. तरी या करसवलत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि मालमत्ता कर जमा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading