मालमत्ता करातील 10 टक्के सवलतीचा शेवटचा आठवडा

ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांचे दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये १० टक्के सवलत आहे. या सवलत योजनेस १५ जुलैपर्यंत प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीचा हा शेवटचा आठवडा असून जास्तीत जास्त करदात्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा याकरीता उद्या सकाळी १०.३० ते ५ आणि रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्र कार्यान्वित ठेवण्यात येत आहे. तरी या सवलतीचा करदात्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे www.thanecity.gov.in या महापालिकेच्या संकेतस्थळाद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरू शकतील. तरी करदात्यांनी आपला मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading