माजी आमदार रामनाथ मोते यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन

राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असलेले माजी आमदार रामनाथ मोते यांच्या अकाली निधनाने शिक्षकांचे चालते-बोलते ज्ञानपीठ हरपले अशी भावना आज शोकसभेत व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर मोते सरांची आठवण म्हणून दरवर्षी २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा स्मृती पंधरवडा पाळून आदरांजली वाहण्याचा निर्धार करण्यात आला.
कोकण विभागातील माजी आमदार रामनाथ मोते यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी ऑनलाईन शोकसभा आयोजित केली होती. अनेक मान्यवरांबरोबरच शिक्षकांनीही सभेत भावना व्यक्त केल्या. या सभेसाठी केवळ ५०० जणांची मर्यादा होती. काही मिनिटांतच कोकणाबरोबरच राज्याच्या विविध भागातून शिक्षकांची उपस्थिती नोंदविली गेली. या सभेला मोते सरांच्या कन्या दिपाली माहे यांची उपस्थिती होती.
मोते सर म्हणजे सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांचा ध्यास घेणारे एक व्यक्तीमत्व होते. त्यांचा शिक्षकांविषयी प्रत्येक प्रश्नाचा सखोल अभ्यास होता. त्याविषयी विधान मंडळ असो कि मंत्री-अधिकाऱ्यांचे दालन यांच्यात त्यांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्वाची प्रचिती येत होती, अशा शब्दांत विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विधीमंडळातील मोतेंची भाषणेही अभ्यासपूर्ण होती. कमालीच्या सच्चेपणाने त्यांनी शिक्षकांच्या अनेक व्यथा सभागृहात मांडून हजारो शिक्षकांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या स्मृती कायम राहतील अशा शब्दांत निरंजन डावखरे यांनी भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading