महिलेचा लॅपटॉप केवळ दीड तासात मिळवून देणा-या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण जाधव यांचा सत्कार

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रवीण जाधव यांनी बुद्धीचातुर्य दाखवून एका महिलेचा लॅपटॉप केवळ दीड तासात मिळवून दिला. दादर येथील श्रद्धा पारखी या ठाण्यामधील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये कार्यरत असून संध्याकाळी रिक्षाने स्टेशनला जात असताना त्यांचा लॅपटॉप गहाळ झाला. त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना तो मिळाला नाही. साडेतीन वर्षांची मेहेनत आणि लॅपटॉप मध्ये असलेल्या लहान मुलांच्या ट्रीटमेंट्सचे अनेक प्रोजेक्ट्सचे काय होणार या चितेंत दुसऱ्या दिवशी त्यांनी समर्थ भांडार ट्रॅफिक चौकी जवळ कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क केला आणि सर्व हकीकत सांगितली. रिक्षाचा पुरेसा नंबर नसताना लॅपटॉप शोधणे हे अतिशय अवघड काम होते. परंतु त्या परिस्थितीतही त्यांनी श्रद्धा पारखी यांना धीर देऊन लॅपटॉप मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. आपला अनुभव आणि बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी केवळ दीड तासात त्या रिक्षावाल्याला शोधून सर्व माहिती विचारून श्रद्धा पारखी यांचा लॅपटॉप मिळवून दिला. या घटनेबद्दल, श्रद्धा पारखी यांनी सर्व वाहतूक पोलिसांचे आभार मानले. तर ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रवीण जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading