महिला-बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविकांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप

ग्रामीण भागामध्ये कोविडचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी महिला – बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करत असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी त्यांनामास्क, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. नुकतेच महिला – बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यातील राहनाळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात सेविकांना कोरोना संरक्षित किट वाटप करण्यात आले. एखाद्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी सर्वेक्षणाची मोहीम संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामार्फत हाती घेण्यात येते. हे सर्वेक्षण आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी करतात. कोरोनाचा वाढता फैलाव आणि सध्याच्या साथरोग परिस्थितीत आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सर्वेक्षणातून जनजागृती करण्यात येते. हे सर्वेक्षण करत असताना अंगणवाडी सेविकांना स्वतःची काळजी घेणे आणि तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे १ हजार ८५४ अंगणवाडी सेविकांना मास्क, हॅन्ड ग्लोवस, सॅनिटायजर, फेसशील्ड चे वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading