महिला दिनानिमित्त महापालिकेतील सर्व नगरसेविकांचा सन्मान

समाजातील नागरिकांचे ठाणे महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व नगरसेविकांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ग्रीन कल्चर, ठाणे यांच्या सहकार्याने महिला नगरसेविकांना इनडोअर प्लान्टचे वाटप करण्यात आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर भव्य स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन न करता प्रतिनिधीक स्वरुपात कोरोना नियमांचे पालन करीत महापौर दालनातच छोटेखानी कार्यक्रम करण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दरवर्षी हा कार्यक्रम रंगायतन येथे कर्मचाऱ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं. यावेळी महापालिकेच्या पाच विशेष समित्यांच्या सभापती आणि नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading