महिलांशी फेसबुक व्हाट्सअप वरून मैत्री करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या ठगाला कासारवडवली पोलिसांनी कोल्हापुरातून केली अटक

महिलांशी फेसबुक व्हाट्सअप वरून मैत्री करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या ठगाला कासारवडवली पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या
एका महिलेने या प्रकरणी तक्रार केली होती. या महिलेशी पायलट असल्याचं सांगून फेसबुक, व्हाट्सअप द्वारे चॅटिंग करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात पाडले होते. त्यानंतर या महिलेला महिलांसाठी
शासनाच्या योजना योजनांची माहिती त्याने दिली. त्यानंतर या महिलेशी गोड गोड बोलून तिला तिचा फोटो मोबाईल वर पाठवण्यास सांगितले, आणि व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले त्यानंतर
या ठगांन तक्रारदार महिलेला आणि ती तिच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायचं सांगून वेळोवेळी 19 हजार रुपये उकळले. हा ठग वारंवार तक्रारदार
महिलेशी संपर्क साधून त्याच्या खात्यात पैसे भरण्यास त्यांना सांगत होता. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन तपासले, त्यावेळी तो कोल्हापूर हून फोन करत असल्याचे निष्पन्न
झाले. कासारवडवली पोलिसांनी यासाठी एक पथक कोल्हापूरला पाठवले. तक्रारदार महिलेला फोन आल्यावर पैसे बँकेत ट्रान्सफर केल्याचे सांगून त्याच्या बोलण्यात गुंतवून त्यास बँकेत चौकशी
करण्यास सांगण्यात आले. कोल्हापूर येथील कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये त्याचे खाते तपासण्यासाठी तो गेला असता कासारवडी पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. रितेश पाटील
या नावाने संपर्क करत असला तरी त्याचं खरं नाव सचिन गडकरी असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पोलीस, अशाच प्रकारे आणखी काही महिलांची जवळीक निर्माण करून त्यांच्याकडून पैसे
उपकळले असण्याची शक्यता लक्षात घेत कासारवडवली पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading