नगरसेवकांना ब्लॅकमेलर संबोदीत पालिका आयुक्तांचाच अधिकाऱ्यांसह सभात्याग

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा नगरसेवक सभात्याग करतात मात्र काल सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेऊन सभात्याग केला.पालिकेच्या सर्वसाधारण
सभेत प्रश्न-उत्तराच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या कोणत्या अधिकाऱ्यांना मुदत वाढ दिली असा प्रश्न विचारला होता?त्याला विभागाच्या
उपायुक्त वर्षा दिक्षित यांनी उत्तर दिले.पण हे उत्तर न पटल्याने कृष्णा पाटील यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हस्तक्षेप करत फक्त एका अधिकाऱ्याला मुदतवाढ
दिल्याचं सांगितलं. पण तरीही कृष्णा पाटील यांनी आयुक्तांना तुम्ही पत्र वाचलं का असा प्रश्न विचारला. त्यावरून आयुक्त संजीव जयस्वाल आणि नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या काहीशी वादावादी
झाली. कृष्णा पाटील यांनी आपला हा हेका कायम ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी यावर सभागृहात पाटील यांना सुनावले. यावेळी नगरसेवकांचा त्यांनी ब्लॅकमेलर असा उल्लेख केल्याने
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संतप्त झाले. आणि त्यांनी सभात्याग केला. यावर आयुक्तांनीही सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सभात्याग केला. मात्र यावेळी इतर सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी मौन
पाळणंच पसंत केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading