महिनाअखेरीसदिघारेल्वेस्थानकसुरूकरण्याचीखासदारराजनविचारेयांचीमागणी

प्ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील मागील ४ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरू करा नाहीतर जबरदस्तीने रेल्वे रोको करून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आम्ही करू असा थेट इशारा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी व मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना पत्राद्वारे करण्यात आला आहे.

या पत्रामध्ये असेही म्हटले आहे की स्थानिक खासदार या नात्याने नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या विनंतीला व मागणीनुसार मी रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार विनंती करून सुद्धा दीघा रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी वेळ नसेल तर रेल्वे प्रवाशी व दिघा वासियांकडून दिघा रेल्वे स्थानक सुरु करू असा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.

तसेच ऐरोली – कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सन २०१६ मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आला होता. या प्रकल्पातील झोपड्यांचे पुनर्वसन होत नसल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. हा महत्वकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून मी एम आर व्हि सी विभागाकडे पाठपुरावा करून प्रकल्प दोन टप्प्यात करून पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करून घेतले आहे. या दीघा परिसरात नव्याने सुरू होणाऱ्या आयटी कंपन्या व त्यामध्ये बाहेरून येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो त्यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ व पैशाची बचत टाळण्यासाठी त्याचबरोबर दिघावासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिना अखेर पर्यंत दिघा रेल्वे स्थानका सुरु करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading