महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य बाजारपेठेतील मार्गावर वाहनांना बंदी

महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्य बाजारपेठेतील कौपीनेश्वर मंदिरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च रोजी जांभळीनाक्यापासून ते सुभाष पथमार्गे बाजारपेठेमधून जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील कौपीनेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 1 मार्च रोजी पहाटे 4 ते रात्री 11 या दरम्यान या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. जांभळी नाक्यापासुन सुभाषपथ मार्गे मुख्य बाजारपेठ मधुन ए वन फर्निचरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने जांभळी नाका येथून उजवीकडे वळण घेवुन टॉवरनाका मार्गे इच्छित स्थळी जातील. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading