महावितरणची सर्व प्रकारची देयकं ऑनलाईन भरण्याची सुविधा

महावितरणनं सर्व प्रकारची देयकं ऑनलाईन भरण्याची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वीज सेवा विषयक बहुतांश देयकं देण्यासाठी ग्राहकांना घरबसल्या देयकं भरता येणार आहेत. मानवी हस्तक्षेप टाळून ग्राहकांना वीज विषयक सर्व सेवा ऑनलाईन देण्याच्या उद्देशानं नवीन वीज जोडणीचे शुल्क, वीज बीलाचा भरणा ऑनलाईन करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता नवीन मीटरचे शुल्क, नादुरूस्त मीटरची किंमत, मीटर तपासणी, सीटीपीटी तपासणी शुल्क, मीटर इतरत्र बसवण्याचे शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे. या सुविधेमुळं संबंधित देयकं भरण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. तसंच देयकाचा भरणा ऑनलाईन झाल्यानं निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणं सुलभ होईल. या सुविधेचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading