महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचा एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेनं एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेच्या गुणगौरव सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी महापौरांच्या हस्ते उत्तम गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सर्वत्र कोचिंग क्लासेसकडून अवाजवी शुल्क आकारून पालकांची लूट केली जाते, हे थांबवून विद्यार्थ्यांना उच्चप्रतीच्या शिक्षणासह विविध स्पर्धेत आपलं कसब दाखवता यावं, असे उपक्रम राबवून क्लासेसची समाजात झालेली बदनामी कमी करण्याच्या हेतूनं महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेनं एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कमीतकमी शुल्क किती असावं याचा निर्णय जिल्ह्यातील तमाम क्लासेसच्या संचालकांना सांगण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन व्यवस्था, प्रसाधनगृह, शुध्द पाण्याची व्यवस्था, क्लासेसच्या वेळा, क्लासेसमध्ये प्रशिक्षित प्राध्यापक नियुक्ती असे अनेक बदल करण्यास संघटनेनं सांगितलं आहे. शाळेतील शिक्षक क्लासेस घेतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्लासेसमध्ये येण्याची सक्ती करतात त्यामुळं शिक्षणाचा दर्जा खालावतो अशा क्लासेसच्या विरोधात संघटनेतर्फे शासनाच्या सहाय्यानं कडक कारवाईसाठी पावलं उचलण्याचा इशारा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading