महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची फुटलेली जलवाहिनी पहाटे ५ पर्यंत दुरूस्त होण्याचा अंदाज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काल देसाई गावाजवळ फुटली असून ही जलवाहिनी पहाटे ५ वाजेपर्यंत दुरूस्त होईल असा अंदाज आहे. काल रात्री १०च्या सुमारास १८०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी देसाई गावाजवळ फुटली होती. ही जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेलं आणि या परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आज दुपारी ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून ही जलवाहिनी दुरूस्त होईपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ही जलवाहिनी रविवारी पहाटे दुरूस्त होण्याची शक्यता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं व्यक्त केली आहे. ही जलवाहिनी दुरूस्त झाल्यानंतरच पाणी पुरवठा सुरू होणार आहे. तोपर्यंत महापालिकेनं पर्यायी पाण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत या जलवाहिनीतून पाणी पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत वॉटर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारी महापालिकेनं केली आहे. ज्यांना पाणी हवं असेल त्यांनी महापालिकेशी त्यासाठी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading