महापालिकेच्या सफाई कामगाराच्या मुलानं मिळवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

ठाणे महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं असून आता हा मुलगा अधिकारी होणार आहे. प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याला ८४९वी श्रेणी मिळाली आहे. त्याची आई ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील पाणी पुरवठा विभागात बिगारी आहेत. प्रशांत भोजने याने एक नाही दोन नाही तर तब्बल आठ वेळा त्याने यूपीएससी परीक्षा पास करण्याचा प्रयत्न केला. आणि आठव्या वेळी त्याने यश संपादन केलं आहे. प्रशांत हा बार्टीच्या शिष्यवृत्तीवर दिल्लीमध्ये शिकायला गेला. मूळचा अभियंता असलेला प्रशांत २०१८ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी म्हणून दिल्लीत गेला. माहिती तंत्रज्ञान शास्त्रात अभियंता असलेल्या प्रशांतनं २०२० ते २०२२ या दरम्यान २ वर्ष नोकरीही केली. स्वत:चं घर लहान असल्यामुळे अगदी दहावीपासूनच तो ग्रंथालयात अभ्यासाला जात असे. शिक्षणादरम्यान येणा-या आर्थिक मानसिक अशा अनेक अडचणींवर मात करत त्याने हे यश मिळवलं आहे. दिल्लीला शिक्षण घेत असताना येणा-या एकटेपणावर मात करण्यासाठी त्याने विपश्यनाही केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तब्बल आठ वेळा दिल्यानंतर त्याला नवव्यांदा पहिल्याच मुलाखतीत यश मिळालं आणि तो उत्तीर्ण झाला. त्याच्या यशामध्ये त्याला शासनाचीही मदत झाली. आता त्याला देशाची सेवा करायची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं. त्याच्या या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading