महापालिकेच्या शाळांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांनl 4 माहिने वेतन नाही

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागात गेली १८ वर्षे शाळा साफसफाई काम कंत्राटी पध्दतीवर करत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करत सफाई कामगारांना १ एप्रिल पासुन शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आले आहे. या कामगारांमध्ये ८०% महीला कामगार असुन एकट्या कमावुन घर चालवित आहे. काही विधवा निराधार आहेत.अनेकांची घरे भाड्याचे असुन घरभाडे थकल्याने आणि रेशन मुला बाळांचे शिक्षण आदी साठी उधारी झाल्याने आता मानसिक तणावाखाली जगत आहे.कामगारांचे उत्पन्न बंद झाल्यामुळे कामगार अतिशय हलाखीचे दिवस काढत आहे. १ एप्रिल ते जून २०२१ पासुन या कामगारांना पगार नाही, अश्या परिस्थितीत जगणे मुश्किल झाले आहे. १० जून पासुन शिक्षक, शिपाई वर्ग कामावर रुजु झाले. शाळेत अस्वच्छता र्निमाण झाली असताना सफाई कामगारांना मात्र हजर करुन घेण्यास मज्जाव केले जात आहे. त्यामुळे शाळेत कामावर नियमितपणे येण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे. गेल्या वर्षी अचानक लागलेला लॉकडाउन १५ मार्च ते ३० आँगस्ट २०२० पर्यंत कोरोनाच्या फैलावा मुळे ५ ते ६ महिने शाळा बंद होत्या. लॉकडाउन काळातील कोणाचेही पगार कपात करु नये असे शासनाने र्निदेश दिले असताना ही आँगस्ट २०२० मध्ये ठाणे कामगार उपआयुक्त यांच्या दालनात अधिकार्‍यांसोबत मिटींगी होउन अर्धा पगार वेतन देण्यात यावे याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्या काळातील एक ही रुपया वेतन अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाही.तसेच महापालिका प्रशासनाकडे आमच्या किमान वेतनाचे फरकाची थकीत रकमेचे देखील वाटप केले गेले नाही.
सध्या कामगारांची कठीण परिस्थिती असताना मार्च २०१५ ते आँक्टोबर २०१६ किमान वेतनातील फरकाचे शिल्लक राहीलेले हत्प्याची रक्कम कामगारांना अदा करण्यात यावे.जेणे करुन कामगारांची उपासमार टळु शकेल असं या पत्रात म्हटलं आहे.
शाळा साफ सफाई साठी कामगारांना कामावर हजर करुन घ्यावे. कोरोना काळातील १५ मार्च २०२० ते ३० आँगस्ट २०२० आणी १ एप्रिल २०२१ ते आतापर्यंत ची वेतन कामगार उपआयुक्त कार्यालयात महापालिका प्रशासनाने मान्य केल्या नुसार ५०% टक्के दराने वेतन अदा करावे. किमान वेतन अधिनियम आधारित सुधारीत वेतनाच्या फरकाची थकित रक्कमाचे उर्वरित हप्त्याची रक्कम अदा करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading