महापालिकेच्या इतिहासात प्रतमच बीएसयुपी प्रकल्पातंर्गत एकाचवेळी होणार २३८३ इतक्या विक्रमी सदनिकांचे वितरण

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयुपी प्रकल्पातंर्गत एकाचवेळी जवळपास २३८३ इतक्या विक्रमी सदनिकांचे वितरण या महिन्याअखेर प्रकल्प बाधितांसह दिव्यांगांना वितरित करण्याचा
महत्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे प्रकल्प बाधितांसह दिव्यांगांना आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या
माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बीएसयुपी प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत तुळशीधाम येथे १६१ सदनिका, सागर्ली रिव्हर वूडस्, कल्याणफाटा येथे ९५ सदनिका, पडले गाव येथे
६५५ सदनिका, कासारवडवली येथे ६३ सदनिका, ब्रम्हांड येथे ३०० सदनिका, सिद्धार्थनगर, कोपरी(पू) येथे २८० सदनिका, खारटन रोड येथे १४४ सदनिका, महात्मा फुले नगर, कळवा येथे १४३
सदनिका आणि टेकडी बंगला येथे १८५ सदनिका महापालिकेस प्राप्त होणार आहेत.

यातील १४४२ सदनिका शहरातील विविध प्रकल्पातंर्गत बाधित झालेल्या लोकांना प्राधान्याने वितरित करण्यात
येणार आहेत. तसेच ७५२ सदनिका या अस्तित्वातील पात्र रहिवाशांना वितरित करण्यात येणार आहेत. १९० सदनिका या दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून त्याची सर्व प्रक्रिया करून त्या
वितरित करण्याचे आदेश जयस्वाल यांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे गावदेवी येथील बाधितांना तसेच कळवा खाडी पूल येथील बाधित मातंग समाजाच्या लोकांनाही बीएसयुपीमधील सदनिका
वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading