महापालिकेची पदपथावरील अतिक्रमणावरील कारवाई पाचव्या दिवशीही सुरूच

ठाणे महापालिकेनं पाचव्या दिवशीही शहरातील पदपथावरील अतिक्रमणं आणि अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवर कारवाई केली. ठाणे शहरामध्ये महापालिका आयुक्तांच्या आदेशानं शहरातील पदपथांवरील अतिक्रमणं आणि अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई सुरू करण्यात आली होती. काल या कारवाईचा पाचवा दिवस होता. या कारवाईअंतर्गत नौपाडा, माजिवडा, लोकमान्य-सावरकरनगर, वागळे, मुंब्रा, उथळसर, दिवा, कळवा, वर्तकनगर अशा सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या, पदपथांवरील अतिक्रमणांवर महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading