ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प काही समितीला सादर करण्यापूर्वीच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी राज्याच्या अर्थ मंत्र्यांकडे केली आहे. ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काल स्थायी समितीला सादर केला मात्र हा अर्थसंकल्प ठाण्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आला. आयुक्तांनी गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी आनंद परांजपे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.