महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास गती मिळणार

ठाणे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सकारात्मक निर्णय घेवून शहरविकास विभागातील कामामध्ये सुसूत्रता आणणे तसेच जलदगतीने कामकाज होण्याच्या दृष्टीने कार्यपध्दती निश्च‍ित केल्याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. यामुळे आता जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे.जुन्या ठाण्यातील पुनर्विकासाला गती मिळावी व प्रस्ताव मंजुरी तात्काळ व्हावी या संदर्भात विकासकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी नुकतीच महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी ठाण्यातील नामांकित विकासक तसंच वास्तुविशारद यांच्यासमवेत आयुक्तांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये ठाण्यातील जुन्या इमारतीचा पुनर्विकास आणि लहान भूखंडावरील विकासाला चालना मिळावी या दृष्टीने सर्वंकष अशी चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी तातडीने स्थायी आदेश काढून ठाण्याच्या विकासाला योग्य दिशा दिली आहे. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी जुन्या ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकास आणि लहान भूखंडावरील इमारतींचा विकास जलद गतीने व्हावा यासाठी सकारात्मक भूमिका घेवून काही अधिकार हे सहाय्यक संचालक नगररचना यांना प्रदान केल्यामुळे ठाण्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading