महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी आहे. राज्यभरातील बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे येत असतात. या अनुयायांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. तसंच चैत्यभूमीवर जाण्या-येण्यासाठी अनुयायांनी बसची मागणी केल्यास राज्य परिवहन महामंडळातर्फे अशा बसेस पुरवल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading