मराठी ग्रंथ संग्रहालयाने डिजीटल माध्यमावर उमटवली मोहोर

मराठी ग्रंथ संग्रहालयानंही आता डिजीटल माध्यमांवर आपले कार्यक्रम सादर करण्यास सुरूवात केली असून दर शुक्रवारी ग्रंथयान हा कार्यक्रम फेसबुकवरून सादर होतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम बंद झाले. डिजिटल माध्यम हे एक नवे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. १ जून हा मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वर्धापनदिन संस्थेने फेसबुकवरून साजरा केला. त्यानंतर दर शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता फेसबुक पेजवर ग्रंथयान ह्या अनोख्या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सादर केले जातात. यात परिसंवाद, मान्यवरांच्या मुलाखती, कथा सादरीकरण, कविता वाचन, संगीत, नाटिका सादरीकरण, तसेच विविध कलाविष्कार अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना घेता येतो. येत्या शुक्रवारी लंडन येथील कलारंग हा ग्रुप द. मा. मिरासदार लिखित “शिवाजीचे हस्ताक्षर” या धमाल गोष्टीचे अभिवाचन सादर करणार आहे. समीर शिरवाडकर, कौस्तुभ वैद्य, निखिल कोरान्ने आणि अभिजीत मोने हे सर्व लंडन निवासी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading