मराठा समाजाच्या ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद

जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठी हल्ल्याचे निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला सकाळी काही वेळ रिक्षा बंद होत्या मात्र नंतर रिक्षाही सुरू झाल्या दुपारनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाले. सकल मराठा समाजाकडून ठाणे बंद ची हाक देण्यात आली होती. त्यामुळे आज ठाण्यातील मुख्य बाजारपेठ तसेच नौपाडा गोखले रस्त्यावर दुकानदारांनी बंदला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीहल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवारी ठाणे बंद पुकारला आहे. या संदर्भात ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा सह आज सर्व पक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत विविध राजकीय पक्षांशी संबंधित मराठा समाजाच्या संस्था आणि संघटनानी या बंदला पाठिंबा दिला होता. ठाणे शहरांमध्ये ठाणे रेल्वे स्टेशन नितीन कंपनी, तीन हात नाका तसेच मुख्यमंत्री यांचे निवासस्थान या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading