मनसुख हिरेन यांची आत्महत्या कि हत्या एक गुढ

सुप्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कथित बॉम्ब असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आज आत्महत्या केली आहे. कळवा खाडीकिनारी त्यांनी ही आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कारण मनसुख हिरेन यांच्या तोंडावरती बरेच हातरूमाल ठेवण्यात आले होते. जेव्हा त्यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा हे रूमालही हस्तगत करण्यात आले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्या दिवसापासून मनसुख हिरेन हे संशयाच्या फे-यात सापडले होते. त्यांचे नौपाड्यामध्ये क्लासिक मोटर्स हे दुकान आहे. ही गाडी चोरी झाल्याची तक्रारही पोलीसांकडे नोंदवण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या मृत्यूमुळे एक गूढ निर्माण झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading