मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान पाहणी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान मुंबई विभागाच्या उपनगरीय विभागाचे निरिक्षण केले. लाहोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुरुवात केली. त्यांनी ठाणे आणि दिवा दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गाच्या प्रगतीपथावरील कामाचा आढावा घेतला. ठाणे स्थानकात पुरविल्या जाणाऱ्या आणि असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. ठाणे महापालिकेसह इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे विकसित होत असलेल्या पूर्वेकडील विद्यमान स्टेशन प्रकल्पावरील मल्टी-मोडल ट्रान्झिट हबचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading