कोरोनाच्या निर्बंधांमुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकराचं बंद दाराआडून दर्शन घेण्याची भाविकांवर वेळ

श्रावणातला आज पहिला सोमवार. भक्तीभरल्या पवित्र अशा श्रावण महिन्यात व्रतवैकल्यांची रेलचेल असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्रावणातला भक्तीरस भाविकांना मंदिरापर्यंत पोहचवता येत नाही ही खंत आहे. मंदिरं अद्याप बंदच असल्यानं श्रावण सोमवारचे अभिषेक, पूजा, व्रतवैकल्यं घरीच साजरी करावी लागणार आहेत. दरवर्षी ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. यंदा मात्र लोक बंद असलेल्या दरवाजा समोरूनच श्रावणी सोमवार निमित्त शंकराची मानस पूजा करून घरी परतत असल्याचे दिसून आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading