मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या ११५ वाहन चालक तसंच सोबतच्या ४४ प्रवाशांवर कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं गटारी अमावास्येच्या पूर्वसंध्येवर मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांविरूध्द एका मोहिमेचं आयोजन केलं होतं. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल ट्रेन बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे अशातच गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अनेक वाहन चालक हे मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात होत असतात. मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेतर्फे वारंवार आवाहन केलं जातं. तरीही ठाणे शहरामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 115 वाहन चालकांविरुद्ध शनिवारी आणि रविवारी मोटरवाहन कायदा कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या 44 वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच चालू राहणार असून मद्यपान करून वाहन चालवू नये असं आवाहन ठाणे वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading