मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – दोन नवीन ॲपची सुविधा

मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी व्होटर्स हेल्पलाईन आणि दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी ही ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदारांनी याचा वापर करावा असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केलं आहे. व्होटर्स हेल्पलाईन या ॲपद्वारे मतदारांना यादीतील नावे शोधणं, नवीन अर्ज अथवा नावाचं हस्तांतरण करणं शक्य होणार आहे. निवडणूक सेवा विषयक तक्रारी, त्यांची स्थिती, मतदान, निवडणूक, ईव्हीएम, निकाल, उमेदवारांची माहिती, निवडणूक अधिका-यांची माहिती, उमेदवारांची यादी तसंच मतदानानंतर सेल्फी अपलोड करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. दिव्यांग नागरिकांना मतदान करणं सोयीचं व्हावं यासाठी पीडब्ल्यूडी हे ॲप विकसित करण्यात आलं असून यामध्ये दिव्यांगांना मतदानाविषयक सर्व प्रकारची कामं, म्हणजे नाव वगळणं, नोंदणी करणं तसंच मतदान केंद्र शोधणं आणि अगदी व्हील चेअरसाठी विनंती करणं अशी सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading