मंगळवारी रात्री सुपरमूनचे दर्शन

मंगळवारी १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात सुपरमून दर्शन देणार आहे. असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. जर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर तो आकाराने १४ टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो. अशा चंद्राला सुपरमून म्हणतात. मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार ४३४ कि.मीटर अंतरावर पृथ्वीजवळ येणार आहे. त्या दिवशी सायं. ७ वाजून २० मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवेल. रात्रभर आपणांस सुपरमूनचे दर्शन देऊन तो सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. यानंतर या वर्षातील शेवटचे सुपरमून दर्शन आषाढ पौर्णिमेच्या रात्री बुधवार १३ जुलैला होणार आहे. परंतु त्यावेळी पावसाळयामुळे आकाश अभ्राच्छादित असण्याची शक्यता असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading