भोरे मार्शल आर्ट ऍण्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय पेंचक सिलाट स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी

भोरे मार्शल आर्ट ऍण्ड स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय पेंचक सिलाट (इंडोनेशियन मार्शल आर्ट) स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. नाशिक येथे सुरु असलेल्या 12वी राज्यस्तरीय पेंचक सिलाट स्पर्धेत अंबरनाथ च्या खेळाडूंनी टँडींग (फाईट) या प्रकारा मध्ये विविध पदके पटकावली आहेत.
10ते11 वर्षीय 28ते30 किलो वजन गटात खेळाडू. यथार्थ ढिवरे याला सुवर्ण पदक तर 12ते13 वर्षीय 36ते39 वजनगटात खेळाडू अंतरा शेळके हिला कांस्य पदक आणि 15ते16 वर्षीय -60किलो वजनगटात खेळाडू प्रणव पांचाळ ह्यांनी कांस्य पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र पेंचक सिलाट असोसिएशन द्वारे घेण्यात आलेल्या राज्य रेफ्री आणि जज च्या परीक्षेत प्रशिक्षक रोहित भोरे हे देखिल उत्तीर्ण झाले आहेत.
अंबरनाथ तालुक्याला प्रथमदाच राज्य पेंचक सिलाट स्पर्धा मध्ये विविध पदके आली आहेत. ह्या खेळाडूंना देशासाठी ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला मेडल आणून देण्याचे स्वप्न आहे असे खेळाडूंशी चर्चा करताना सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading