भारत-पाक विश्वचषक सामन्यात ठाणेकरांनी झळकवला नरेंद्र मोदी-शिवसेना प्रमुखांचा फलक

मॅन्चेस्टर येथे झालेल्या विश्वकप सामन्यात ठाण्यातील प्रेक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फलक झळकवले. दिव्यातील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. काल अत्यंत रोमहर्षक असा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या वेळी या तिघांनी आगरी-कोळी टोप्या परिधान करून सामन्याचा आनंद तर लुटलाच पण सामन्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र असलेला हिंदुस्थान के दो शेर असा फलक झळकवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading