भाजीपाल्याच्या दरासह आता मसाल्याच्या किमतीतही वाढ

दररोजच्या जेवणात वापरला जाणारा मसाला हा महाग झाला आहे. जिऱ्याची फोडणी तर महागलीच पण त्या पाठोपाठ लवंग, मिरी, हळद, दालचिनी सह इतरही मसाल्याचे पदार्थ महाग झाले आहेत. 40 ते 45 टक्क्यांनीही मसाले महागल्यामुळे गृहिणींना मसाले खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे. टोमॅटो भाजीपाल्याच्या दरासह आता मसाल्यांच्या किमतीत दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. घाऊक बाजारामध्ये 1 किलोसाठी जिरे 700 ते 900 लवंग 700 ते 800 काळी वेलची 800 रुपये मोजावे लागत असून किरकोळ बजारत तर जिरे, लवंग, काळी वेलची खरेदी करताना 1 किलो साठी 900 ते 1000 रुपये मोजावे लागत आहे. अवकाळी पावसाचा फटका मसाल्यांना बसल्यामुळे दर वाढले आहेत. इथून पुढेही दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading