भविष्यात राज्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा इशारा

भविष्यात राज्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं दिला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जवळ जवळ दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असतानाही सर्व क्लासेस संचालक हे क्लासेस बंद करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने स्वतःहून गेल्यावर्षी मार्च महिन्यात शासनाला सहकार्य म्हणून क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत हे सर्व क्लासेस बंदच आहेत. शाळा या ऑनलाइन चालू आहेत. परंतु त्यांना त्यांची फी पूर्ण घेण्याचा अधिकार आहे असे हायकोर्टाने सांगितलेले आहे. परंतु क्लासेस बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीला देशात अजूनही एवढे महत्त्व दिले नाही. म्हणून विद्यार्थी क्लासेस कडे वळत नाहीत. त्यामुळे मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांमध्ये क्लासेस संचालकांना शिक्षकांचे पगार, अवाच्या सवा येणारे लाईट बिल, रूम भाडे आणि घर खर्च हे चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आत्तापर्यंत क्लासेस संचालकांनी अनेक निवेदने दिलेली आहेत. परंतु त्यांनी क्लासेस संचालकांना कोणत्यातरी गुपित कारणासाठी वेठीस धरलेले आहे. वारंवार निवेदने देऊनही क्लासेस संचालकांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्य पालकांना सुद्धा हे कळते की क्लासेस मध्ये विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने वर्ग सुरू करता येऊ शकते. असं असूनही क्लासेस बंद ठेवणे हे जाणून बुजून केलेले कृत्य आहे. त्यामुळे काही धनदांडग्या श्रीमंत लोकांच्या ऑनलाइन व्यवस्थेला हाताशी धरून सामान्य क्लासेस संचालकांना संपवण्याचं हे षडयंत्र आहे. आमच्या वारंवार निवेदनाकडेही लक्ष दिले जात नाही म्हणून येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सर्व क्लासेस संचालक हे बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहोत. पुढील कोणत्याही तयार होणाऱ्या परिस्थितीला शासन स्वतः जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading