भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

ठाणे महापालिकेच्या वतीने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे करण्यात आली असून आज दुसऱ्या दिवशीही भर पावसात महापालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली. आज सकाळी महापालिका आयुक्तांनी वंदना बस डेपो येथून नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वंदना बस डेपो, शिवप्रसाद, आंबेडकरनगर, एम. एच. हायस्कूल, सिडको क्रीक रोड, सरस्वती स्कूल राबोडी, साकेत नाला, सह्याद्री नाला, दत्तवाडी तसेच शनिमंदिर साईनाथनगर आदी नाल्याची पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी नाल्याची रुंदी वाढविणे, खोली वाढविणे, खाडीच्या मुखाजवळ नाले रुंद करणे तसेच कचरा आणि सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading