बेकायदेशीरपणे सदस्यत्व जमवणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे मिनाक्षी शिंदेंचे आदेश

महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सदस्यत्व जमवणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेतर्फे लोकमान्यनगरमध्ये रहिवाशांच्या सोयीसाठी तरण तलाव उभारण्यात आला आहे. या तरण तलावाचे महापालिकेकडून अद्याप उद्घाटन करण्यात आलेले नाही. मात्र लोकमान्यनगर परिसराबरोबरच वागळे इस्टेट परिसरात श्री सिध्दीविनायक एन्टरटेन्मेंट कंपनीकडून तरण तलावाच्या सदस्यत्वासाठी पत्रकं आणि अर्ज वाटप केलं जात आहे. या पत्रकात कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिकेनं अद्यापि तरण तलाव सुरू केलेला नाही. तसंच या तरण तलावाचं व्यवस्थापनही कोणत्याच संस्थेकडे सोपवण्यात आलं नव्हतं. यामुळं सामान्य ठाणेकरांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी याबाबत महापौरांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत महापौरांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading