ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी चक्क आरती केली. नागरिकांना वेळोवेळी घरातच थांबण्याचे कळकळीचे आवाहन केले जात आहे. मात्र तरी देखील काही बेजबाबदार नागरिक विनाकारण अथवा एखादे क्षुल्लक कारण काढून घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांना समजावून त्यांना शिक्षा करून वैतागलेले पोलीस आता त्यांची रस्त्यावर आरती करत आहेत. ठाण्यात आज सकाळी वॉकला आलेल्या अनेकांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून चक्क आरतीच करण्यात आली.