बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

बांधकाम करताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडुन गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात घडली. रजनीकांत मिलकुट्टी असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात मुळ कंत्राटदार अंकीतकुमार पटेल आणि सहकंत्राटदार लक्ष्मण कालागाडुला या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोपरी परिसरातील पै गल्लीतील एचडीएफसी बँकेची शाखा असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम करताना 28 जुलै रोजी सकाळी सव्वा अकराच्या रजनीकांत हा मजूर लिफ्टच्या बोगद्यातुन खाली कोसळला होता. गंभीररित्या जखमी झाल्याने सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान रजनिकांतचा मृत्यु झाला. त्यानुसार दोघा कंत्राटदारांवर सुरक्षेची साधने न पुरवल्याने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading