बनावट प्रमाणपत्र देणा-या टोळीतील आणखी चौघांना अटक

बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषधविक्रीचा व्यवसाय करणाºया दुकानदार आणि बनावट प्रमाणपत्र देणा-या टोळीतील आणखी चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे. याच टोळीतील १३ जणांना यापूर्वीच अटक केल्यामुळे आता या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १७ च्या घरात गेली आहे.जानेवारी २०१९ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अशी बनावट प्रमाणपत्रे देणा-या टोळीतील संस्था चालकांसह १३ जणांची धरपकड केली होती. ठाण्यातील ढोकाळी भागातील ‘दीप पॅरामेडिकल आॅर्गनायझेशन’ ही संस्था डी फार्मसीच्या बनावट प्रमाणपत्राची विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. याच चौकशीमध्ये आता कमलेश पटेल, जगदीश चौधरी, वजाराम चौधरी आणि चुनीलाल चौधरी या आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी अरविंदकुमार भट, राजू यादव, बुधाराम अजेनिया, बलवंतसिंग चौहान, पुरु षोत्तम ताहिलरमानी, विशाल पाटील या सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण मेडिकल दुकाने चालवणारे फार्मासिस्ट असल्याची माहिती होती.याच प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार, युनिट-१ च्या पथकाने या रॅकेटमधील नरेंद्र गेहलोत, हरिशंकर जोशी, दीपक विश्वकर्मा,प्रेमचंद चौधरी, प्रवीण गड्डा आणि महेंद्र भानुशाली या सहा जणांना अटक केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading