बकरी ईदच्या दिवशी कल्याण आणि भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये बदल

बकरी ईदच्या दिवशी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.
मुंबई ठाणे / मानकोली कडुन जुना ठाणे आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणा-या जड़ / अवजड वाहनांना अंजुरफाटा या ठिकाणी ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने वसई रोड मार्गाने कारीवली जकातनाका, विटभट्टी मार्गे इच्छित स्थळी जातील. जुना ठाणे आग्रा रोडने अंजुरफाट्या कडुन भिवंडी शहरात येणा-या टि.एम.टी./ एस.टी., सर्व प्रकारच्या बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पो.स्टे. येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. रांजनोली नाका कडुन भिवंडी शहरात येणा-या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने मुंबई नाशिक बायपास हायवे वरील मानकोली नाका येथून अंजुरफाटा किंवा ओवळी खिंड येथून ओवळी गाव, ताडाळी जकातनाका पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील. भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) पर्यायी मार्ग येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईने इच्छित स्थळी जातील. वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना एस. टी. बसेससह धामणगाव जांबोळी पाईपलाईन नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवून पाईपलाईन मार्गे वाड्याकडे व पुढे इच्छित स्थळी जातील. तसेच एस. टी. बसेस आपले प्रवाशी चाविंद्रा जकातनाका या ठिकाणी उतरवतील व तेथूनच प्रवाशी घेवून बस वळवून इच्छित स्थळी जातील. शिवाजी चौकाकडून वंजारपाटी नाका मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवाजी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने अजयनगर- संगमपाडा मेट्रो हॉटेल डावीकडे वळून वंजारपाटी ब्रिजवरुन इच्छित स्थळी जातील. तर कल्याण शहरातील लालचौकी कडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
ही वाहने लालचौकी येथे उजवीकडे वळण घेवून आधारवाडी चौक – वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. भिवंडी कडून कल्याण शहरातील आग्रारोड मार्गे गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याण कडे जाणारे सर्व वाहनांना दुर्गामाता चौक येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने दुर्गामाताचौक येथे डावीकडे वळण घेवून वाडेघर सर्कल आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. कोळशेवाडी बाजूकडून गोविंदवाडी बायपास मार्गे दुर्गामाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पत्रीपुल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने पत्रीपुल शिवाजी चौक-लाल चौकी येथे उजवे वळण घेवून आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. दुर्गाडी चौक- गोविंदवाडी बायपास पत्रीपुल मार्गे व दुर्गाडी चौक-शिवाजी चौक-पत्रीपूल मार्गे जाणाऱ्या कंटेनर, टेलर, इत्यादी मल्ट्रीएक्सल / जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीस बकरी ईदच्या दिवशी पूर्ण वेळ दिवसा व रात्रौ सर्व वेळांत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading