आषाढीनिमित्त विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. गेले दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे आषाढी एकादशीला भाविक मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकले नव्हते. परंतु यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सकाळपासूनच विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी दिसत आहे. ठिकठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कुणी विठ्ठलाची रांगोळी, कुणी चित्र तर कुणी भक्तीतून आपल्या लाडक्या विठ्ठलाला आळवत असल्याचं दिसून येत आहे. अभंग, किर्तन, भक्तीगीतं यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading