प्लास्टिकविरोधात महापालिकेची कडक कारवाई – ३०० किलो प्लास्टिक जप्त तर २ लाखांचा महसूल जमा

स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार १६ एप्रिल ते ३० डिसेंबर या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि समाज विकास विभाग यांच्या समन्वयाने प्लास्टिक वापरणाऱ्या १००० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण ५० ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये ३०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून २ लाख १८ हजार ४०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. प्रतिबंधीत प्लास्टिक साठवणूक, हाताळणी व विक्री करणाऱ्या १००० आस्थापनांवर एकूण ५० ठिकाणी कारवाई करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर संबंधित आस्थापनांना महिला बचत गटामार्फत तयार केलेल्या एकूण २१,८४० कापडी पिशव्यांचे वाटप करून कापडी पिशव्या विक्रीतून २,१८,४०० रुपयांचा महसुल जमा करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading