प्राच्यविद्या संस्थेच्या इमारतीमध्ये वाढदिवस पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

ठाण्यातील प्राच्यविद्या संस्थेच्या इमारतीमध्ये एका वाढदिवस पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून संताप व्यक्त होत असून प्राच्यविद्या संस्थेचे संचालक डॉ. विजय बेडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे निषेध व्यक्त केला आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्था गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असून भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेचे संशोधन तसंच प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहे. ३० हजाराहून अधिक संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ वस्तूंचा संग्रह संस्थेत असून त्यासाठी महापालिकेकडून हजुरी येथील श्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालयाची इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह सुरू करण्याचा ठराव करून तशी अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्या रविवारी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीमुळे हा प्रकार समोर आल्यामुळे बेडेकर यांनी आयुक्तांना पत्र पाठवून निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading