प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ काल ठाण्यात झाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, इफको -टोकिओ विमा कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ही दोन्ही वाहने संपूर्ण जिल्ह्यात जाऊन पिक विमा योजनेचा प्रचार आणि प्रसार करतील.