प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच दसरा – दा. कृ. सोमण

अपराण्हकाली आणि प्रदोषकाली आश्विन शुक्ल दशमी असल्याने उद्याच विजया दशमी म्हणजेच दसरा सण साजरा करायचा आहे. तसेच या दिवशी श्रवण नक्षत्र आहे हा एक दुग्धशर्करा योग असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. या दिवशी अष्टभुजा देवीने दुष्ट महिषासुर राक्षसाला ठार मारले. यावेळी देवीने विजया हे नाव धारण केले म्हणून दस-याच्या सणाला विजया दशमी म्हणतात. या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या झाडाच्या ढोलीत लपविलेली शस्त्रे बाहेर काढून त्यांची पूजा करून ती वापरण्यास सुरुवात केली. कोत्साने याच दिवशी शमी आणि आपट्याच्या झाडाखाली ठेवलेल्या सुवर्णमुद्रा लोकांना नेण्यास सांगितल्या. आश्विन महिन्यात शेतातील धान्य घरात येते म्हणून या दिवशी हा समृध्दीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सीमोल्लंघन करावयाचे असते. आधुनिक काळात अंधाराकडून प्रकाशाकडे,  आळसाकडून उद्योगीपणाकडे, अज्ञानाकडून  ज्ञानाकडे, अंधश्रद्धांकडून वैज्ञानिक दृष्टीकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे आपणा सर्वांस सीमोल्लंघन करावयाचे आहे असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading