प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विशाल मानेने मिळवले घवघवीत यश

घरात अठराविश्व दारीद्र्य असतानाही परिस्थितीवर मात करुन झोपडपट्टीत राहणार्‍या विशाल माने याने दहावीच्या परिक्षेत 95 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. श्रीरंग विद्यालयात शिकणारा विशाल हा सिद्धेश्वर नगर येथील झोपडपट्टीत राहतो. वडील एका खासगी कंपनीत असून घरात गरीबी असतानाही मुलांना शिकवण्याची जिद्द माने दाम्पत्याने बाळगली होती. अत्यंत छोट्या घरात राहणार्‍या विशालने प्रचंड जिद्दीने अभ्यास करीत 95 टक्के गुण मिळवले. त्याच्या यशाबद्दल त्याचं कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading