पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन पुन्हा कामावर रूजू

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन आज पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले आहेत. आज पोलीस आयुक्तालयात त्यांना मानवंदना देऊन त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. १६ सप्टेंबरला कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर विवेक फणसळकर हे घरी परतले होते. ८ सप्टेंबरला त्यांना कोरोना संक्रमण उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ताप आणि घसा दुखीमुळे त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळं ते रूग्णालयात दाखल होते. यातून ते बरे झाल्यानंतर १६ सप्टेंबरला त्यांना रूग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी काही दिवस विश्रांती घेऊन आपण पुन्हा सेवेत रूजू होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानुसार पुन्हा ठणठणीत बरे झाल्यावर विश्रांती घेऊन ते आज पुन्हा आपल्या सेवेत रूजू झाले. आज पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना ठाणे पोलीस आयुक्तालयात मानवंदना देण्यात आली. नंतर पोलीस कर्मचा-यांनी गुलाब पुष्प उधळून त्यांचं कार्यालयात मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading