पोलीसांच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला असून जिवित आणि वित्तहानी टळली

राबोडी पोलीसांच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला असून मोठी जिवित आणि वित्तहानी टळली आहे. काल दुपारी राबोडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कॅडबरी जंक्शन येथे नाका बंदी लावण्यात आली होती. त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर सोनवणे आणि पोलीस शिपाई गणेश चव्हाण नाकाबंदी करत असतांना चव्हाण यांना केमीकलने भरलेल्या ट्रक मधून धुर येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाहन चालकास हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चालकास आवाज न आल्याने तो ट्रक मुंबईच्या दिशेने वेगाने निघून गेला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका स्कुटीवाल्याला थांबवून चव्हाण यांनी गाडीचा पाठलाग करत तीनहात नाक्याच्या आधीच ट्रक थांबवला आणि ट्रक चालकास भरलेल्या ड्रम मधून धुर येत असल्याची माहिती दिली. वाहन चालक आणि साथीदारांनी तात्काळ पाण्याचा मारा करुन ड्रम मधून येणा-या धूरावर नियंत्रण मिळवले. पोलीसांच्या या सतर्कतेमुळं मोठी जिवित आणि वित्त हानी टळल्यामुळे वाहन चालकाने पोलीसांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading