पोलीसांच्या कुटुंबासाठी पोलीस वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करण्याची अशोक वैती यांची मागणी

कोविडच्या काळात सर्व यंत्रणांबरोबर पोलीसांनी देखील आपली सेवा अत्यंत चांगल्या रितीने बजावत आहेत, तसेच अनेक पोलीसांना कोविडची लागण झाल्याने त्यांनी प्राणही गमवावे लागले आहे. 24 तास सेवा देणाऱ्या पोलीसांच्या कुटुंबियांसाठी पोलीस वसाहतींमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी सभागृह नेते अशोक वैती यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू आहे, त्याच पध्दतीने सर्व पोलीस वसाहतीमधील पोलीसांच्या कुटुंबांकरिता लसीकरण केंद्र सुरु करावे, जेणेकरुन पोलीसांच्या कुटुंबियांना ते राहत असलेल्या ठिकाणी जावून लस घेता येईल. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधनसामुग्रीसह व्यवस्था करुन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सर्व पोलीस वसाहतीमध्ये सुरू करण्याची मागणी वैती यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून अनेक पोलीसांनी आपले लसीकरण करुन घेतले आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांचे अजून लसीकरण झालेले नाही. यासाठी पोलीस वसाहतीमध्ये लसीकरण केंद्र सुरू केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल असेही अशोक वैती यांनी नमूद केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading