पेंढारकर कॉलेज समोरील फुटपाथ लगत लावण्यात आलेली काही झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार

डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर कॉलेज समोरील फुटपाथ लगत लावण्यात आलेली काही झाडे अज्ञात इसमाने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्यावरणप्रेमीने मानपाडा पोलीस ठाण्यात रस्त्याच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार झाडे तोडल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला. एकीकडे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शहरात झाड तोडले जात असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मिशन हिरवीगार डोंबिवली अंतर्गत डोंबिवली पूर्वेकडील पेंढारकर कॉलेज समोरील रस्त्यावर पर्यावरण मित्रांनी झाडे लावली होती. महिनाभरापूर्वी ही झाडे कुणी अज्ञात इसमाने तोडल्याचे पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आले. पर्यावरण मित्रांनी याबाबत तक्रारी केल्या. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने अखेर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading