खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी आणि ब्रम्हांड आझाद नगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा लोकार्पण

शिवसेना नेते, खासदार राजन विचारे यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार  आपल्या खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी आणि ब्रम्हांड आझाद नगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसेच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर, तुळजा भवानी मंदिरा समोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक-मालक संघटनेने केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आले होते यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उप जिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी, सुनील पाटील, उप शहर प्रमुख तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी  संघटनेचे सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading