पूर्व द्रूतगती महामार्गावर आनंदनगर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा

पूर्व द्रूतगती महामार्गावर कोपरी आनंदनगर चेकनाका येथे आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. राज्य शासनानं हळूहळू लॉकडाऊन शिथील करण्यास सुरूवात केली असून आजपासून खाजगी कार्यालयांना १० टक्के कर्मचा-यांसह उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत जाण्यासाठी नोकरदार वर्गाने गर्दी केली असून पूर्व द्रूतगती महामार्गावरील आनंदनगर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. एकीकडे कोरोना रूग्णांमध्ये दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत असताना आता लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे अजूनच चिंतेत भर पडल्याची चर्चा होत आहे. दरम्यान मध्य रेल्वे बंद असल्यामुळे डोंबिवलीकरांनीही बस पकडण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading